Go Back
Report Abuse

Narmada Parikrama Tour package By Shree Sadguru Tours

✅ VERIFIED Popular
Screenshot 2025-12-07 184622
Screenshot 2025-12-07 184955
Screenshot 2025-12-07 184622
Screenshot 2025-12-07 184955

Information

नर्मदे हर !!! नर्मदे हर !!! नर्मदे हर !!!

भारत देश हा सृष्टीसौंदर्याने नटलेला देश आहे. नद्या, पर्वत, जंगल, वाळवंट, समुद्र, हिमच्छादित प्रदेश असे भिन्न भिन्न प्रकार आपल्या एकाच देशात बघावयास मिळतात. हे सर्व भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना माता मानले जाते. नद्यांची दैवी प्रभावाची कल्पना जाणीव आपल्या पूर्वसूरींना असल्यामुळे नद्यांबद्दल आदर व्यक्त करण्याची पुरातन परंपरा इथल्या भूमीत चालत आलेली आहे. अर्थात हे सर्व व्यक्त करण्याच्या नानाविध प्रथा पद्धती रीतीभाती आहेत, अशापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण आणि पॄथ्वीतलावरची एकमेवद्वितिय परंपरा आहे नर्मदा परिक्रमा.

भारतामध्ये नर्मदा नदीपेक्षाही अनेक मोठ्या नद्या आहेत परंतु परिक्रमा केवल नर्मदेचीच केली जाते. नर्मदा परिक्रमा ही सर्वप्रथम श्री मार्कंडेय मुनी यानी केली,त्यांना शास्त्रोक्त महापरिक्रमेला जवळजवळ २७ वर्ष लागली.

नर्मदा परिक्रमा कुणी, का, कोणत्या वयात, कशी नी कश्यासाठी करावी ?… नर्मदा परिक्रमा कुणीही करावी, इथे जन्म, जात, वंश, जाती, धर्म, लिंगभेद, वय यांची अजिबात अडकाठी नाही. नर्मदा परिक्रमा हे मानवी मनाच्या सबलीकरणाच, निर्मलीकरणाच साधण आहे. आपल्या स्वत:शिवाय दुसऱ्या कुणाच्याच हातात हे नाही. दुसऱ्याचे अनुभव वाचून किंवा ऎकून ते उमगलं कळलं तरी त्याची अनुभूती स्वत:ची स्वत:च घेणं केव्हाही उत्तम, त्यामुळे नर्मदा परिक्रमा आयुष्यात केव्हाही करायला काहिच हरकत नाही.

पायी नर्मदा परिक्रमा ही चार्तुमास पाळून साधारण ३ वर्ष ३ महिने १३ दिवसात पूर्ण होते. ज्यांना शारिरीकदृष्ट्या किंवा वेळेअभावी पायी परिक्रमा शक्य नाही अश्यांनी २ ते ३ आठवड्याच्या कालावधीत वाहनाद्वारे परिक्रमा पूर्ण केली तरीसुद्धा चालते. परिक्रमा कशीही करावी, पण ती जाणीवपूर्वक, डोळसपणे नी श्रद्धेने करणे अगत्याचे आहे. ही परिक्रमा म्हणजेच शारिरीक, मानसिक व अध्यात्मिक तप आहे. नर्मदा परिक्रमा ही जवळ जवळ ३५०० किलोमीटर आहे. सर्व नद्यांमध्ये गंगा नदी श्रेष्ट असली तरी परिक्रमा फक्त नर्मदेचीच केली जाते.

Details

Duration (Days)
20

Tour Cost

Package Type
Tour

Itinerary Details

Itinerary Overview
Day 1
मुंबई/पुण्यावरून इंदोर पर्यंत AC रेल्वे अथवा बस प्रवास
ओंकारेश्वर येथे संकल्प करुन AC बसद्वारे परिक्रमा सुरु होईल.
उज्जैन वरून मुंबई/पुण्यापर्यंत रेल्वे प्रवास

Day 2
पुणे/मुंबई येथून इंदोर कडे प्रस्थान.

Day 3
इंदोर येथे पोहोचणे व ओंकारेश्वरकडे प्रस्थान. ओंकारेश्वर येथे मुक्काम.

Day 4
ओंकारेश्वर येथे ममलेश्वराचे दर्शन करने. नर्मदा परिक्रमा संकल्प करून, परिक्रमा उचलणे. व कन्यापूजन व कढाई प्रसादाचे वाटप करून परिक्रमा प्रारंभ.
लेपा येथील भारती ठाकूर यांचा प्रकल्प बघून, रावेरखेडी येथील बाजीराव पेशवे यांच्या समाधीचे दर्शन व बडवाणी येथे मुक्काम.

Day 5
प्रकाशा येथील दक्षिण काशी क्षेत्राचे दर्शन व मुक्काम.

Day 6
शूलपानेश्वराचे दर्शन व कुंभेश्वर दर्शन, भालोद दर्शन व मुक्काम.

Day 7
विमलेश्वर, बुलबुलकुंड ह्या स्थळांचे दर्शन घेऊन कटपूर येथील समुद्राकडे प्रस्थान. भरतीच्या वेळा बघून समुद्रातून बोटीमार्गे मिठीतलाई येथे पोहोचणे. (समुद्र प्रवास ५ तासांचा असेल.)

Day 8
नारेश्वर येथे रंगावधूत स्वामींचे दर्शन करून नारेश्वर येथे मुक्काम.

Day 9
कुबेर भंडारी दर्शन व गरुडेश्वर येथे टेंभे स्वामींच्या मंदिरात दर्शन करून गरुडेश्वर येथे मुक्काम.

Day 10
गरुडेश्वर वरून महेश्वर कडे प्रस्थान व महेश्वर येथे मुक्काम.

Day 11
मंडलेश्वर येथे दर्शन करून नेमावर येथे मुक्काम. नेमावर हे मैयाचे नाभीस्थान आहे, येथे आपण मैयाची ओटी भरू शकता.

Day 12
ग्वारीघाट, भेडाघाट दर्शन करून जबलपूर येथे मुक्काम.

Day 13
अमरकंटक कडे प्रस्थान व मुक्काम. अमरकंटक हे नर्मदा मैयाचे उगमस्थान आहे.

Day 14
दिंडोरी मार्गे लेखनादिन येथे पोहोचणे. महाराजपूर येथे मुक्काम.

Day 15
हौशंगाबाद कडे प्रस्थान व मुक्काम.

Day 16
हरदा, खांडवा मार्गे ओंकारेश्वर येथे परतणे. ओंकारेश्वर येथे संकल्पपूर्ती, कोटी लिंगार्चन व पापनाशन पूजा व मुक्काम.

Day 17
ओंकारेश्वर वरून उज्जैन कडे प्रस्थान. उज्जैन येथे महाकालेश्वर, काळभैरवनाथ दर्शन व उज्जैन येथे मुक्काम.

Day 18
उज्जैन येथून दुपारी पुणे कडे प्रस्थान.

Day 19
पुणे येथे पोहोचणे.

Day 20
एक दिवस समुद्राप्रवासा साठी राखीव ठेवलेला असतो.

Travel Preferences

Travel Style
Pilgrimage
Amenities
Hotel, Food, Transportation
Tour Guide
Yes
Category
Narmada Parikrama Yatra

Inclusions / Exclusions

Inclusions
✅सर्व प्रवास खर्च : पुणे ते पुणे रेल्वे तिकीट, इंदोर ते इंदोर एसी बसने प्रवास
✅दररोज दोन पाण्याची बाटल्या
✅दोन वेळचा चहा, कॉफी
✅सकाळी नाष्टा
✅दोन वेळचे जेवण (कांदा लसूण विरहीत)
✅राहण्याची सुविधा स्वच्छ व नीटनेटक्या हॉटेल मध्ये २/३ शेरिंग बसिस वर.
✅दोन ठिकाणी एकत्रित पद्धतीने मुक्काम
✅समुद्र प्रवासाचे बोट तिकीट
Exclusions
Excluded
❌रेल्वेमधील चहा, नाष्टा, जेवण, पाण्याचा खर्च वैयक्तिक असेल
❌संकल्प पूजा, संकल्पपूर्ती पूजा, पापनाशन पूजा या पुजेची दक्षिणा
❌कन्यापूजन
❌अमरकंटक येथे छोट्या गाड्यामधून स्थलदर्शन करावे लागते, त्याचे शुल्क.

Booking Details

Pickup Location
Mumbai
Contact Phone

Terms and Conditions

:-
रिक्रमा स्वरुप
नर्मदा परिक्रमा करताना आपल्या उजव्या हाताला नर्मदा ठेऊन परिक्रमा करायची असते.
परिक्रमेत कोठेही मैयाला ओलांडून जायचे नसते.
नर्मदा हि कन्या स्वरुपात असल्यामुळे या यात्रेत कन्या पूजनाला अनन्य साधारण महत्व आहे.
नर्मदा मैयाची परिक्रमा हि ओंकारेश्वर येथे संकल्प करून, कढाईच्या प्रसादाने सुरु होईल. ओंकारेश्वर येथून ब्राह्मणाद्वारे अभिषेक करून नर्मदेचे पाणी एका बाटलीत किंवा कॅन मध्ये भरून घेणे व परिक्रमा पूर्ण झाल्यावर त्याच पाण्याने संकल्प पूर्ण करणे.
नर्मदा परिक्रमा ही जवळ जवळ ३५०० किलोमीटर आहे.
परिक्रमा हि AC बसने असेल . बसमध्ये रोटेशन पद्धतीने बसण्याची व्यवस्था असेल.
जरी हि परिक्रमा बसने असली तरीही पायी परीक्रमेचे सर्व नियम पाळले जातील.
हि यात्रा पूर्णपणे धार्मिक असल्यामुळे, दररोज सकाळी व संध्याकाळी देवाचे नामस्मरण , नर्मदाष्टक , नर्मदा आरती , भजन केले जाईल.
यात्रेदरम्यान शाकाहारी व सात्विक आहारच दिला जाईल. (जेवणात कांदा व लसूण यांचा वापर होणार नाही)
परिक्रमा दररोज सकाळी लवकर सुरु होईल व रात्री मुक्काम केला जाईल. कोठेही रात्रीचा प्रवास नसेल. फक्त कटपूर येथे भरतीच्या वेळा पाहून रात्रीच्या वेळी समुद्र प्रवास असू शकतो. समुद्र प्रवास करताना जीव रक्षक कवच (Life Jacket)देण्यात येईल.
परिक्रमेदरम्यान कोणत्याही प्रकारचे व्यसन, धूम्रपान करणे वर्ज असेल.
परिक्रमे दरम्यान मुख्य उपवास असल्यास त्यानुसार उपवासासाठी फळे, खिचडी, भगर , उपवासाचे पदार्थ उपलब्ध करून दिले जातील, परंतु आपल्या वैयक्तिक उपासाच्या वेळी मात्र प्रत्येक वेळी व्यवस्था होईलच असे नाही, त्यावेळी आपल्याला फळे उपलब्ध करून देण्यात येतील.
काही नियम व अटी

यात्रेमध्ये मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे “प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्वावर प्रवेश दिला जाईल.
यात्रेच्या बुकिंग करतेवेळी स्वतःची माहिती देणारा फॉर्म भरणे आवश्यक आहे.
आपण बुकिंग दरम्यान फॉर्म मध्ये भरलेल्या माहितीची गुप्तता राखण्यात येईल. आपण दिलेली आपली वैयक्तिक माहिती आमच्याकडे सुरक्षित असेल.
यात्रेच्या नोंदणी करिता यात्रेच्या एकूण रक्कमेपैकी १०,०००/- रुपये एवढी रक्कम भरणे आवश्यक आहे व उर्वरित रक्कम यात्रेला जाण्याच्या १५ दिवस आधी भरावी लागेल. उर्वरित रक्कम दिलेल्या अवधीत जमा न केल्यास बुकिंग रद्द करण्याचे अधिकार संस्थेला असतील.
हि रक्कम आपण रोखीने, चेकने किंवा ऑनलाईन ट्रान्सफर करून भरू शकता अथवा आमच्या बँक खात्यामध्ये जमा करू शकता. (बँक खातेविषयक तपशील खाली दिला आहे.)
यात्रेकरूंच्या वैयक्तिक कारणांवरून त्यांना यात्रेला येण्यास शक्य होणार नसल्यास बुकिंग करतेवेळी भरलेली 10000 रुपये रक्कम यात्रेकरूंना माघारी मिळणार नाही याची नोंद घ्यावी.
बहुतांश ठिकाणी अपंग तसेच वृद्ध व्यक्तींसाठी व्हील चेअर सारख्या सुविधा उपलब्ध असतीलच असे नाही, त्यामुळे अशा ठिकाणी प्रवाशांकडून सहकार्याची अपेक्षा असेल. तसेच परिस्थितीनुरूप कार्यक्रमांच्या रुपरेषेत बदल होऊ शकतो, या बाबत कोणीही तक्रार करू नये.
ट्रीपला जाण्याच्या ठिकाणी नैसर्गिक स्थिती तसेच हवामानाच्या अवस्था लक्षात घेऊन सहलीच्या तारखांमध्ये फेरबदल करण्याचे अधिकार संस्थेला असतील. तारखांमध्ये बदल करण्यात येणार असेल तर त्याची माहिती १५ दिवस आधी प्रवाशांना देण्यात येईल, त्याबद्दल सहकार्याची अपेक्षा असेल.
महामारी, चक्रीवादळ, अतिवृष्टी, पूर, भारतबंद अथवा कोणत्याही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणास्तव यात्रा रद्द करावी लागल्यास झालेला खर्च वजा करूनच आपली रक्कम परत करण्यात येईल.
जर आपणास कुठल्याही प्रकारचा आजार असल्यास त्याच्या संबंधित सर्व प्रकारचे औषध जवळ बाळगणे आवश्यक आहे.

Tour Organizer

Organizer Name
Shree Sadguru Tours
Address
Pune ,Maharashtra

There are no reviews yet.

Enquire Tour package

Organizer Profile

Avatar

Shree Sadguru Tours

Member since 3 months ago
View Profile